बदलत्या जीवन शैलीत व धकाधकीच्या युगात ही म्हण तंतोतंत लागू पडतेय.अतिथी देव भव याप्रमाणे दारातला पावणा,याचक,मागतकरी तांबभर पाणी,घोटभर च्या व दोन घास यानेच समाधानाने तोंड भरुन कवतुक करुन हसत मुखाने परतीला लागायचा.
सध्याच्या जमान्यात हे शक्य आहे का?वाढते शहरीकरण,स्वतंत्र जीवनशैली,वैयक्तिकपणा ,संस्काराचे नाविन्य करण ,वेळेचा अभावामुळे हे जुळत नाही.पण ज्याच्याकडे अजून माणुसकी जागी आहे.त्यांच्याकडे शक्य आहे.
वरवरील मया अन् मनापासूनची तळमळ लगेच ध्यानात येते.आपणच दुसऱ्या कडून अपेक्षा करीत असू तर आपल्यात बद्दल करण्याची नितांत गरज आहे.जीव लावल्यावर रानच पाखरु आपलं होत.पण हेळसांड केल्यास आपलं परकं होतय.
जित्यापणी नाय गोडी अन् गेल्यावर झिंज्या तोडी
आपलाच अतिथी प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१