देव्हा-यात देवघरा जवळ समई लावणे.याचा अर्थ प्रकाशाचे कवडसे पाहणे.पण भावार्थ समई म्हणजे आई सम असणारे प्रतिक होय.(सम=सारखी,ई=आई)
आई सारखी असणारी ती समई. आई जशी आपल्या कुटुंबाची काळजी घेते.तसेच भगवंताजवळ सुख समाधान आरोग्य संस्कार योग्य धनलक्ष्मी याची मागणी करते.
देवघरात जळणारी समई अहोरात्र आपल्या साठी शुभ चिंतन करत असते. देवाला आपण आई म्हणतो. विठाई, माऊली,तुकाई,नामाई असे संत नामाभिदान करतो.त्यावेळी
समईतील उजेड अधिक तेजस्वी होतो. एवढे मातेचे व समईचे महत्त्व आहे .
सुकन्येला शुभविवाहात रूखवातामध्ये प्रामुख्याने समई दिली जाते. त्याच बरोबर ग्रंथ दान करावे.माते तू दिलेल्या समईने मी सासर माहेर उजळून काढील.नात्या नात्यात जो अज्ञानाचा,अंधकारमय विचाराचा पगडा समईतील वातीप्रमाणे लख्ख करीन.
समई प्रज्वलीत झाल्यावर क्षणात अंधार नाहीसा होऊन प्रकाशाने देवघर उजाळून जाते.त्याप्रमाणे आई तुझ्या संस्कार रुपी समईने देहाची वात करुन त्यागाच्या तेलाने नातेसंबंध संभाळीन.
देव व भक्त यांचे जवळीक नाते समईच्या उजेडाने अधिक कटीबद्ध होते ना अधिक तसेच मायलेकीच नातं रहाते.दीपज्योती(मायलेकी) नमोस्तुते.समई समयानुसार कार्य करीत असते.आपले लक्ष्य समईतील स्थित्यातंरावर असावे.अन्यथा उजेड उशाशी अन् अंधार पायथ्याशी असे होऊ नये.
समई ही त्यागरुपी आईचे मांगल्यरुप आहे
आपलाच समईव्रती प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१