सुप्रभात…..दिवे घाट चढण दिसे सोपाननगरी


दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । फलटण । पुण्यातून हडपसर मार्गी पालखी सोहळा मार्गस्थ होताना उत्साहाच उधाण आलेलं आहे. ढगाळ वातावरण , हिरवीगार वनराई, मोकळी हवा यातून वारकरी पाऊले दिवे घाटाकडे मार्गस्थ होतात. योगिनी एकादशी या पवित्र दिनी माऊलीची दमदार वाटचाल घाटातून होताना हा नयनमनोहर सोहळा याचि डोळा , याचि देही पाहणे भाग्यच. विविध पुष्पाने नटलेला रथ , खिलारी सजवलेली बैलजोड्या , नागमोडी वळण , दिवे घाटाची हिरवाई , मस्तानी तलाव , दिवे ग्राम वेशीवर भव्य दिव्य लोकदैवत विठ्ठलाची मनोहरी प्रतिमा जणू कौतुके स्वागतस सज्ज असाच भास होतो.

हवेली तालुक्यातून ऐतिहासिक पुरंदर नगरीत आगमन मंजे सीताफळाचे आगरच भेटीला. कातोबा विद्यालय , जाधव गढी , वाघिरे महाविद्यालय , महात्मा फुले यांची जन्मभूमी खानवडी ,थोर साहित्यिक प्र. के. अत्रे यांचे क-हेच पाणी यांची आठवण होतेच. एकादशीचे फराळ , सासवडकरांचे अतिथी पणा , संत सोपनादेवांची भेटी याने तळावर जाताचा अभंगाच्या सुरवटीने वारकरी राहुट्यात विराजमन होतात. पालखी तळावर कीर्तन दरबार सुरु होऊन वारकरी श्रवणाने दिव्य घाटाची चढण विसरुन तल्लीन होऊन जातात.

जणू दिवेघाट हेच सूचित करतो की , जीवनाच्या वाटेवर असेच विविध घाट भेटणार. त्यातून अनुभवाचे गाठोडे घेऊन भ्रमंती केल्यास यश लाभणार.

आपलाच सोपनलिन प्रा. रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१


Back to top button
Don`t copy text!