दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
वसुंधरा फाऊंडेशन, कोळकी व महाएनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुधेबावी येथे गोमय रक्षासूत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दुधेबावी (चौंडी वस्ती) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वसुंधरा फाऊंडेशन, कोळकी आणि महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा रक्षाबंधनाचा उपक्रम राबविण्यात आला. गाईच्या शेणापासून बनविण्यात आलेल्या राख्या मुलांना बांधण्यात आल्या. यावेळी गोमय राख्यांचे महत्त्व मुलांना सांगण्यात आल्या. राख्या पाहून मुलांमध्ये उत्साह व कुतूहल निर्माण झाले.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा लता नाळे, मुख्याध्यापिका देढे, खाडे व नाचण उपस्थित होत्या.