
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२४ | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे आज सोमवार दि. ०२ सप्टेंबर रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त फलटण येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
– उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा दौरा पुढीलप्रमाणे –
-
दुपारी ३ वाजता – सांगावी येथे आगमन व स्वागत.
-
दुपारी ३ वाजून ३० वाजता – अनंत मंगल कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने “भव्य – मेळावा”.
-
सायंकाळी ५ वाजता – अनंत मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठक.
-
सायंकाळी ५ वाजून ४५ वाजता – महाराजा मंगल कार्यालय येथे तालुक्यातील कामगारांची बैठक.
