सोने बाजारात नवरात्रीपासूनच दिवाळी, 2 महिन्यांत दर वाढण्याची शक्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.५: नवरात्रीपासून तेजीत असलेल्या सोने बाजारात अद्याप नववधूचा साज असलेल्या ज्वेलरीची उचल नसली तरी लाइटवेट ज्वेलरीचा ट्रेंड आहे. यात सोनसाखळीला सर्वाधिक मागणी आहे. कमी वजनाची (८-१० ग्रॅम) सोनसाखळी व त्यानंतर फॅशनेबल नेकलेस, पेंडंट, इअररिंग्ज, मंगळसूत्र, कडे, बांगड्यांना मागणी वाढली आहे.

राज्यात सुमारे ३० हजार किरकोळ विक्रेते सराफा व्यावसायिक आहेत. २०१९ च्या तुलनेत यंदा ५० ते ६० टक्के व्यवसाय होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले की सोन्याचा दर ५३ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत ते ५९००० पर्यंत पोहोचेल, अशी शक्यता आहे.

जव्हेरी बाजारातील झळाळी परतली; दिवाळीपर्यंत जास्त उलाढालीचे संकेत

राज्यात सोने बाजारातील सर्वात जास्त उलाढाल मुंबईच्या जव्हेरी बाजारात होते. येथील झळाळी परतली आहे. मुंबईनंतर पुणे, जळगाव, औरंगाबाद, नागपूरचा क्रमांक लागतो.

सुवर्णनगरीत जास्त उलाढाल

सुवर्णनगरी जळगावात दसऱ्यानंतर ग्राहकांचा कल वाढल्याने लाइटवेट दागिन्यांच्या खरेदीत दिवाळीपर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त उलाढालीचे संकेत आहेत. ३ ग्रॅम, ५ ग्रॅम ते १० ग्रॅमपर्यंतचे लाइटवेट दागिने जसे इअररिंग्ज, चेन, ब्रासलेट्सला जास्त पसंती आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!