सोनं 42 हजारापर्यंत होऊ शकतं स्वस्त; आज काय होणार?


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: कोरोनाच्या संकटात आता व्हॅक्सिनबाबत आनंदाच्या बातम्या येत असल्यानं लोकांना दिलासा मिळत आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवरही होताना दिसत आहेत. सोन्याच्या किंमतीत घट होत असून ऑगस्टमध्ये उच्चांक गाठल्यानंतर सातत्याने सोनं स्वस्त होत आहे. काहीवेळा दर वाढलाही मात्र त्या तुलनेत किंमत कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे.

शुक्रवारीसुद्धा सोन्याच्या किंमती कमी झाल्या. गुरवारच्या तुलनेत सोन्याचे दर शुक्रवारी 94 रुपयांनी कमी झाले होते. यामुळे सोन्याचा दर 49 हजार 97 रुपये प्रति दहा ग्रॅम असा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली. तर डिसेंबरमध्येही तसंच काहीसं चित्र आहे. पहिल्या आठवड्यात मात्र किंमतीत 490 रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदी जवळपास 3 हजार रुपयांनी वधारली होती. 

दिल्लीतील सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याची किंमत 102 रुपयांनी कमी झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला 48 हजार 594 रुपये इतका झाला. त्याआधी सोन्याचा दर 48 हजार 696 रुपये इतका होता. तर चांदीच्या दरात मात्र केवळ 16 रुपयांची घट झाली. शुक्रवारी चांदी 62 हजार 734 रुपये प्रति किलोग्रॅम होती. त्याआधी चांदीचा दर 62 हजार 750 रुपये प्रति किलो इतका होता. 

ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56 हजार 254 रुपयांवर पोहोचला होता. चांदी 76008 रुपये प्रति किलो इतकी झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू होत आहे. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना व्हॅक्सिनमुळे शेअर बाजार वधारला असून सोन्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता असून सोनं 42 हजार रुपयांपर्यंत किंमत कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!