
थेट WhatsApp वर मिळवा
सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून ५ ऑक्टोबर रोजी दरात किंचित घसरण झाली आहे.
स्थैर्य, सातारा , दि. ०५ ऑक्टोबर : सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली असून २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४९ हजार १७० रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही किंचित घट नोंदवण्यात आली असून प्रति किलो दर २ लाख ३४ हजार ९०० रुपये इतका झाला आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील आजचा बदल
४ ऑक्टोबरच्या तुलनेत २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे १० रुपयांची किंचित घट झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३६ हजार ७४० रुपये तर १८ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ११ हजार ८८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय चांदीचा भाव २३४.९० रुपये प्रति ग्रॅम झाला आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
मुंबई आणि पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार ७४० रुपये तर २४ कॅरेटचा दर १ लाख ४९ हजार १७० रुपये नोंदवला गेला आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेटसाठी १ लाख ३६ हजार ७७० रुपये तर २४ कॅरेटसाठी १ लाख ४९ हजार २०० रुपये मोजावे लागत आहेत. दिल्ली, जयपूर आणि लखनौमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३६ हजार ८९० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव १ लाख ४९ हजार ३२० रुपये आहे.





