आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मार्च २०२३ । मुंबई । आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ मार्चला सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कालपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत आहे. येथे १० ग्रॅम सोन्याचा भाव ६० हजारांच्या जवळ पोहोचला आहे.

जागतिक बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे आज डॉलरच्या दरात घसरण झाली आहे, त्यामुळे एमसीएक्समध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर देशातील अनेक शहरांमध्ये सोने स्वस्त आणि महाग झाले आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५९८४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने सुरू झाला. डॉलरच्या किमतीत वाढ आणि इतर कारणांमुळे आज सोन्याचा उच्चांक ५९९५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

पण एमसीएक्सवर सोने ५९९४० रुपये प्रति १० ग्रॅमच्या वाढीसह व्यापार करत होते, यामध्ये ०८ टक्के किंवा ४५ रुपये प्रति १० ग्रॅम वाढ झाली आहे.

MCX वर, १ किलो चांदीची किंमत ३३ टक्क्यांनी किंवा २३८ रुपयांनी वाढून ७२०१२ रुपयांवर पोहोचली. चांदीची किंमत ७१९५० रुपये प्रति १० ग्रॅमने सुरू झाली आणि ७२१४३ रुपये प्रति १ किलोने उच्चांक गाठला. सोन्या-चांदीची ही किंमत जून आणि मे फ्युचर्ससाठी आहे.


Back to top button
Don`t copy text!