स्थैर्य, गोखळी: फलटण पूर्व भागातील शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी यांची बारामती तालुक्यातील येणे जाणे सुरू होऊन त्यांची गैरसोय दुर करावी अशी मागणी भाजपचे नेते पै. बजरंग गावडे यांनी प्रांताधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोविड 19 रोखण्यासाठी शासनाने सुमारे दोन महिने अधिक लावलेल्या लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसाय प्रामुख्याने पान टपरी, वडापाव व अनेक खाद्यपदार्थ, रिक्षा बंद असल्याने त्यावर चरितार्थ चालवणारे त्याचप्रमाणे लॉज, हॉटेल रेस्टॉरंट या व्यवसायातील वेटर, आचारी, सफाई कामगार कापड व तत्सम दुकानातील कामगार यांची रोजीरोटी बंद झालेली आहे. ग्रामीण भागात शेतावर मोलमजुर करणारे स्त्री, पुरुष, शेतमजूर, शेतमाल शेतातून काढून वाहून आणणारे त्याचे छाटणी करुन पॅकींग करणारे ते बाजार पेठेपर्यंत वाहून नेणारे छोटे वाहतुकदार वगैरे कष्ट करुन आपली व कुटूंबाची रोजीरोटी चालविणारे सर्व प्रकारच्या मजुरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सामाजिक स्वयंसेवी संस्था दानशुर व्यक्तीने केलेल्या मदतीने आत्तापर्यंत प्रसंगी अर्धपोटी राहून हे कुटुंब जगले आहेत यापुढे हे कितपत सुरु राहतील याविषयी शाश्वती नसल्याने शासनाने या लोकांना रेशनकार्डवर मिळणारे धान्य, डाळी, तेल साखर लॉकडाऊन उठून सर्व व्यवहार सुरळीत सुरु होईपर्यंत मोफत द्यावे. तसेच वर खर्चासाठी प्रत्येक कुटूंबाला दरमहा एक हजार रुपये द्यावेत.
फलटण तालुक्याच्या पुर्व भागामधील शेतीमाल हा प्रामुख्याने बारामती मार्केटमध्ये जात असतो. तसेच या पुर्व भागामधील 36 गावातील एक हजार कामगार बारामती एम.आय.डी.सी.मध्ये कामाला जात आहेत. त्यांची गैरसोय रोखण्यासाठी गोखळी मेखळी पुल सुरु करावा. तालुक्यातील कारखान्याने शेतकर्यांची एफ. आर. पी. प्रमाणे तीन महिन्याची बिले दिली नाहीत . तरी त्या कारखान्यांने ऊस बिले दयावीत नाहीतर शासनाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा . महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रामपंचायतीला शेतकर्यांची संकलित कर, पाणीपट्टी, लाईट बील माफ करुन त्यांनी हे अनुदान स्वरुपात ग्रामपंचायतला दयावे.अशी मागणीही पै. बजरंग गावडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उदय मांढरे व रवी फडतरे यांची उपस्थिती होती.