वहागावातून रात्रीत चोरट्यांनी पळवल्या शेळ्या; शेतकऱ्यांत घबराट


 

स्थैर्य, वहागाव (ता. कऱ्हाड), दि.४ : येथील टाकेवस्ती व पीर नावाच्या शिवारातून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या 60 हजार रुपये किमतीच्या नऊ शेळ्यांसह एक बोकड चोरून नेल्याची घटना आज सकाळी सात वाजता उघडकीस आली. 

पोलिसांची माहिती अशी, वहागाव येथील शेतकरी गावडे यांच्या पीर नावाच्या शिवारात शेळीपालनासाठी शेड बांधले आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गावडे हे 50 हजार रुपये किमतीच्या आठ शेळ्या जनावरांच्या गोठ्याच्या शेडमध्ये बांधून घरी गेले. आज सकाळी साडेसात वाजता त्यांच्या आठही शेळ्या चोरून नेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना देऊन शेळ्यांचा शोध घेतला. रमेश पवार यांच्या टाकेवस्ती नावाच्या परिसरातून दहा हजार रुपये किमतीची एक शेळी व बोकड चोरीस गेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर गावडे व पवार यांनी तळबीड पोलिसांत तक्रार दिली. एकाच रात्रीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 60 हजार रुपये किमतीच्या नऊ शेळ्या व बोकड चोरून नेल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!