कृषी कायद्याविरोधात ‘किसान’ आक्रमक; साताऱ्यात धरणे


 

स्थैर्य, सातारा, दि.४: शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान संघर्ष समन्वयच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. 

याप्रसंगी कामगार शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा, बळीराजा शेतकरी संघटना, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारे कायदे मंजूर केले आहेत. या कायद्याविरोधात पंजाब, हरियाना व इतर काही ठिकाणांहून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदा तयार करून देशातील सर्व शेतकरी व शेतमाल उत्पादकांचे खासगीकरण होऊन बाजार समिती यंत्रणा संपण्याचा धोका आहे. रेशनवरील अन्नधान्य व स्थानिक बाजारपेठांमधून उपलब्ध होणाऱ्या शेतमालास अडचण होणार आहे. 

यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा करूनही शेतकरीविरोधी कायदा केला आहे. या कायद्याविरोधात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरूनही सरकारने आंदोलनाची दखल न घेता शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. चर्चा न करता आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्न केला आहे. यासाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ धरणे धरल्याचे किसान संघर्ष समन्वय संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!