चेंबुर येथील मुलींच्या वसतिगृह इमारतीचे उद्या उद्घाटन होणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२३ । मुंबई । चेंबुर येथील वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश फातर्पेकर उपस्थित राहणार आहेत.
मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, चेंबूर, शासकीय आयटीआय जवळ, आर. सी. मार्ग, चेंबूर-पूर्व, मुंबई येथे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मंगरुळपीर जि. वाशिम व बार्टी अंतर्गत येरवडा संकुल पुणे येथील UPSC चे निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. तसेच समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल ॲपचे उद्घाटनही यावेळी होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!