घरफोडी करून बालिकेचे अपहरण करणाऱ्यास अटक बालिकेची सुटका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । रविवारी पहाटे मल्हारपेठ -पंढरपूर रस्त्यालगतच्या वीटभट्टी कामगारांच्या राहत्या घरी चोरीचा डाव चोरांनी आखला व त्याचवेळी तेथील बालिकेचेही त्यांनी अपहरण केले.यामुळे मायणी परिसरात खळबळ माजली. परंतु पोलीस यंत्रणेकडून तातडीने राबवण्यात आलेल्या तपास यंत्रणेमुळे सदर अपहरण झालेली बालिका धोंडेवाडी, ता. खटाव याठिकाणी आरोपीच्या ताब्यातून सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला व १२ तासापासून चाललेल्या या सर्व प्रकारावर पडदा पडला.

याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र व पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे, दि .०६ रोजीचे मध्य रात्री १.०० ते २.०० वा . चे दरम्यान मौजे गुंडेवाडीफाटा, गुडेवाडी, ता. खटाव येथील विट भट्टीवरील मोलमजुरी करुन आपले कुटूंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या मजुरांचे घरात घरफोडी चोरी करुन सदर ठिकाणाहुन एका ६ वर्षाचे बालीकेचे अपहरण करुन तिला लपवून ठेवल्याच्या घटनेबाबतची खबर मायणी पोलीस दुरक्षेत्र येथे प्राप्त होताच वडुज पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व मायणी पोलीस दुरक्षेत्र येथील पोलीस उप निरीक्षक श्रीमती शितल पालेकर यांना मिळताच, सदर अपहरीत बालीकेचा व आरोपीचा कसुन शोध घेतला. धोंडेवाडी ता. खटाव याठिकाणी मजुरीसाठी आलेला संशयित आरोपी रमेश सुरेश वाघमारे वय ३३ वर्षे रा. हाल, ता. खालापुर, जि. रायगड याचे ताब्यातुन अपह्रत बालीकेची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले. ताब्यात येताच बालीकेस तिचे आई वडीलांचे सुखरुप ताब्यात देण्यात आले आहे.

सदर आरोपीस वडुज पोलीस ठाणे गु.र.नं. ३२ / २०२२ भा.दं. सं . ३६३ , ३६५ ४५७ , ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे . या आरोपीचे रमेश सुरेश वाघमारे वय ३३ वर्षे रा . हाल , ता . खालापुर , जि रायगड असून त्याने यापूर्वी अशाच प्रकारचे इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का? याबाबत अधिक तपास पोलीस घेत आहेत.

पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक, अजित बोऱ्हाडे यांच्या सुचनांप्रमाणे डॉ. निलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दुरक्षेत्र येथील पोलीस उप निरीक्षक श्रीमती शितल पालेकर, पोलीस अंमलदार पो हवा. नाना कारंडे, पो. ना. दिपक देवकर, पो. ना. कृष्णा साळुंखे, पो. ना. भुषण माने, पो. ना. अमोल चव्हाण, पो.कॉ. योगेश सुर्यवंशी, पो. कॉ. महेंद्र खाडे यांनी सदर कारवाई केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक श्रीमती शितल पालेकर या करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!