अपघातांचा वाढता धोका; घाडगेवाडीत स्पीड ब्रेकर बसवण्याची ग्रामस्थांची मोठी मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण-सातारा रस्त्यावरील घाडगेवाडी गावातून जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या वेगामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ नोव्हेंबर : फलटण-सातारा रस्त्यावरील घाडगेवाडी (ता. फलटण) गावातून जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या अतिवेगामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवण्याची मागणी घाडगेवाडी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

रस्त्याच्या कामामुळे वाढला वाहनांचा वेग

घाडगेवाडी गावातून जाणारा फलटण ते सातारा हा रस्ता नुकताच सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. विशेषतः कॉर्नरच्या ठिकाणी वेगात येणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने अपघात होत असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची मागणी

वाहनांच्या वाढत्या वेगामुळे गावातून रस्ता ओलांडताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी गावातून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी जाड आकाराचे स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी आग्रही मागणी घाडगेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!