
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. ३ जुलै : सातारा शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने आता नागरिकांनी पावसापासून बचावाची तयारी सुरू केली असून, बाजारात पावसाळी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
खरेदीची लगबग:
-
राजवाडा परिसरात गर्दी: पावसापासून बचाव करण्यासाठी सातारा शहरातील राजवाडा परिसरातील छत्री आणि रेनकोट विक्रेत्यांची दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली आहेत.
-
‘स्वस्तात मस्त’ साहित्याला पसंती: राजपथावरील निर्वासित लोकांच्या व्यापारी संकुलामध्ये (रेफ्युजी मार्केट) ‘स्वस्तात मस्त’ आणि चांगल्या प्रतीचे पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हर) उपलब्ध असल्याने, ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे.
(छायाचित्र: अतुल देशपांडे, सातारा)
