अस्थींचे विसर्जनातून दिला गावडे कुटुंबियांनी पर्यावरण संतुलनाचा संदेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 7 जून 2025। गोखळी । गोखळी ता.फलटण येथील ह.भ.प.श्रीमती गुणाबाई नानाभाऊ गावडे ( मुकदम) यांच्या अस्थींचे विर्सजन तिसर्‍या दिवशी नदीपात्रात न करता वृक्षारोपण करून करण्यात आले. तसेच घरासमोरील अंगणात स्वर्गीय गुणाबाई नानाभाऊ गावडे यांच्या कायम आठवणींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून अस्थींचे विर्सजन करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अस्थींचे विर्सजन नदीपात्रात न करता वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनाचा संदेश दिला. अस्थींचे विर्सजन वृक्षारोपण करून करण्याचा निर्णय गावडे कुटुंबातील सर्वांनी मिळून घेतला. अस्थींचे विर्सजन नदीपात्रात करण्याची प्रथा, परंपरा आहे यास फाटा दिला. नागरीकांनी सुध्दा जुन्या प्रथा, परंपरांना बाजूला ठेवून नदी पात्रातील पाणी प्रदूषित होणार नाही, पर्यावरण संतुलन राखले जाईल याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असे आवाहन गावडे (मुकदम) कुटुंबाने केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!