
दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
मठाचीवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाविद्यालयाच्या उद्यानकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रमाबाबत शेतकर्यांशी सुसंवाद प्रस्थापित करून कृषी विषयामधलाच एक भाग म्हणजे पशूवैद्यकीय चाचणी शिबिर मठाचीवाडी येथे उद्यानकन्या यांनी संपन्न केले.
या कार्यक्रमामध्ये पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पशुवैद्यकीय चाचणीचे महत्त्व शेतकर्यांना पटवून देऊन त्यांच्यामध्ये पशू आरोग्याबद्दल जनजागृती प्रस्थापित केली. जसे की, पशूआजार, पशूखाद्य तसेच गोळ्यांची व जनावरांची नियमित स्वच्छता याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी.निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या स्नेहल निकम, प्रज्ञा देशमुख, नम्रता ढोपरे, वैभवी रणवरे, गायत्री शेडगे, अस्मिता शिंदे यांचा समावेश होता. या उद्यानकन्यांनी दोन दिवस अगोदरपासून गावांमध्ये पशूवैद्यकीय चाचणी पत्रिकांमार्फत सर्व शेतकरी ग्रामस्थांना आमंत्रित केले. शेतकर्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. चाचणीदरम्यान शेतकर्यांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पवार यांनी दिली.
उद्यानकन्यांनी शेतकर्यांचे तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून शिबिराच्या कार्यक्रमाचा निरोप समारंभ केला. या चाचणीदरम्यान शेतकर्यांनी उद्यानकन्यांचे कौतुक केले.