सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण काकडे व सोनवडीचे जावेद शेख यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते लक्ष्मण विजय काकडे व सोनवडी गावचे जावेद शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

फलटण तालुक्यातील सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विजय काकडे यांचे चिरंजीव लक्ष्मण काकडे तसेच त्यांचे सहकारी सोनवडी बु. गावचे सामाजिक कार्यकर्ते जावेदभाई शेख, बाबु सोनवलकर, गुणवरे गावचे नितीन बागाव, सोमवार पेठेतील गौरव जगताप, अभिषेक माने, राहुल बनसोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांना पुष्पहार घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष हरिश काकडे, सामाजिक न्याय शहर अध्यक्ष सिध्दार्थ काकडे, शिवा अहिवळे, मनोजभाई इंगळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!