फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे तरडगाव येथे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त व फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील उद्यानकन्यांचे ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड २०२४-२५ कार्यक्रमाअंतर्गत तरडगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासक अधिकारी बी. बी. भोसले, ग्रामसेवक डी. जे. सोनवणे, मंडल अधिकारी आर. एम. खाडे, ग्रामपंचायत सदस्य व तरडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, पुढील दहा आठवड्यांमध्ये राबवण्यात येणार्‍या शेतीविषयक प्रात्यक्षिक, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, रक्तदान शिबिर, शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चा, मृदा दिन, इ. कार्यक्रमांविषयी उद्यानकन्यांकडून माहिती देण्यात येईल. तसेच शेतकर्‍यांचे अनुभव, त्यांच्या शेती पद्धतीचा सखोल अभ्यास करणार आहेत.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. आर. पाटील, डॉ. जे. व्ही.लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या मदने वैष्णवी, सोनवलकर दिपाली, ननावरे शिवांजली, जगताप सलोनी व कांबळे सुरभी या पुढील कार्यक्रम राबवणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!