कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार; एक जण ताब्यात, इतरांचा शोध सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कोल्हापूर, दि.११: एका गर्भवती महिलेवर 5 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील रायगड कॉलनीत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ही पीडित महिला आसामची असून तिला गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेला कोल्हापूरात आणताना वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील रायगड कॉलनीत एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला आसामची असून तिला गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेला कोल्हापूरात आणताना वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!