बारामती मध्ये गणेशाचे उत्साहात स्वागत


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । बारामती । मांगल्याचे प्रतीक असलेल्या लाडक्या गणरायाचे बारामती शहरांमध्ये जोरदार उत्साहात, पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. बुधवार 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पासून पहाटे 04:48 दुपारी 01:54 पर्यंत घरोघरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा मुहूर्त असल्याने नागरिकांनी सकाळी 6 वाजले पासून श्री गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती
बारामती शहरातील पेन्सिल चौक, संदीपा कॉर्नर, सूर्यनगरी चौक व पीएनजी चौक, एम ई एस शाळे जवळ गणेश मूर्ती स्टॉल उभारण्यात आले होते. लालबागचा राजा, दगडूशेठ,कसबा गणपती आदी मूर्तीना मोठी मागणी होती त्याच प्रमाणे गणेशा साठी पूजेचे, सजावट साहित्य व नेवैद्य साठी विविध आकारातील मोदक ला मोठी मागणी होती.

दुपारी दोन वाजे पर्यंत घरोघरीच्या घरोघरी च्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी नागरिकांनी तर मध्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात व ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाचे आगमन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!