एटीम कार्ड अदलाबदल करून महिलेस 20 हजारांचा गंडा


 

स्थैर्य, सातारा, दि.२२: येथील प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये खाली पडलेले एटीएम कार्ड उचलून देण्याच्या बहाण्याने एकाने कार्डची अदलाबदल करू न महिलेची 20 हजारांची एकाने फसवणूक केली.

याबाबत माहिती अशी, रफिदा शब्बीर बागवान या दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता प्रतापगंज पेठेतील एटीएम सें टरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचे कार्ड खाली पडले. तेथे असलेल्या अनोळखी व्यक्तीने तुम्ही वाकू नका, मी उचलून देतो, असे सांगितले व त्यांचे कार्ड न देता लबाडीने दुसरे कार्ड दिले. यानंतर फिर्यादीच्या एटीएम क ार्डमधून 20 हजारांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून पोउनि चोरगे तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!