
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि. २३: जरंडेश्वर नाका, सातारा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून 35 हजार 280 रुपयांच्या देशी दारूच्या 48 बाटत्या तसेच अॅक्टिव्हा मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पंकज उर्फ दीपक ज्ञानेश्वर पवार रा. मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा याला सीआरपीसी नुसार नोटीस बजावली आहे.
दरम्यान, कोडोली येथील कमानीच्या पत्र्याच्या आडोशाला जुगार घेणार्या जितेंद्र लादमल शहा वय 56 याच्याकडून 1260 रुपये रोख आणि साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यासही सीआरपीसी नुसार नोटीस बजावली आहे.



