दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ व्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीमधून राज्यातील आपत्ती सौम्यीकरणाअंतर्गत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पूर/दरड प्रतिबंधक कामांना ४ कोटींच्या (४०० लक्ष) निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात पुरामुळे नुकसान होऊ नये म्हणून ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी फलटण-कोरेगाव मतदार संघासाठी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसनअंतर्गत फलटण तालुक्यातील दहा कामांसाठी २६९ लक्ष व उत्तर कोरेगावमधील सहा कामांसाठी १३१ अशी एकूण ४०० लक्ष (चार कोटी) कामांना दिनांक ३०/०९/२०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून सदर कामे लवकरच सुरू होणार आहेत.
दरम्यान, या कामांमध्ये उत्तर कोरेगावमधील मौजे दहिगाव बेघरवस्ती ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २२ लक्ष, मौजे आसनगाव गावाजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २४ लक्ष, मौजे घिघेवाडी गावाजवळ गावाजवळ संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष, मौजे वाघोली बौद्धवस्तीजवळ संरक्षण भिंत बांधणे २५ लक्ष, मौजे तळीये स्मशानभूमीजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २५ लक्ष, मौजे सोळशी स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे १५ लक्ष, फलटण तालुक्यातील आळजापूर ओढ्याकाठी संरक्षण भिंत बांधणे ३५ लक्ष, जावली जालसिद्धनाथ मंदिराजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे ५० लक्ष, गोखळी स्मशानभूमीजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे ३५ लक्ष, मठाचीवाडी जिल्हा परिषद शाळेमागे ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष, निरगुडी गावाजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे ३४ लक्ष, तरडगाव स्मशानभूमीजवळ संरक्षण भिंत बांधणे १५ लक्ष, हनुमंतवाडी झोपडपट्टी येथे ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष, आदर्की बुद्रुक स्मशानभूमीजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष, आदर्की बुद्रुक माळवाडी सदन, अकोबा निंबाळकर यांच्या शेताजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २२ लक्ष, हिंगणगाव स्मशानभूमीजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे १८ लक्ष यांचा समावेश आहे.