विडणीतील महिलांना लक्ष्मी पतसंस्थेच्यावतीने “सत्यशोधक” सिनेमाचा मोफत शो

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 12 जानेवारी 2024 | फलटण | विडणी ता. फलटण येथे कार्यरत असणाऱ्या लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित असणारा “सत्यशोधक” ह्या सिनेमाचे एका शोचे बुकिंग करण्यात आले असून विडणी येथील सुमारे 350 महिलांना मोफत चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; विडणी येथील 350 महिलांना “सत्यशोधक” हा सिनेमा मोफत दाखवण्यात यावा; अशी मागणी गावातील सर्वसामान्य महिलांनी लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन डॉ. सौ. सुचिता बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन सौ. शोभा सुनील नाळे व सचिव किशोर मनोहर ननावरे यांच्याकडे केली. त्यावर पतसंस्थेच्या वतीने तातडीने निर्णय घेऊन मोफत “सत्यशोधक” सिनेमा मोफत दाखवण्यात येणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!