
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । पुणे । पुणे शहरामध्ये गरीबांसाठी अत्यंत अल्पशा दरामध्ये दवाखाना चालवणाऱ्या भीमा चारीटेबल ट्रस्टच्या मंगल क्लिनिकला फलटण येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणाऱ्या भीमा चारीटेबल ट्रस्ट संचलित मंगल क्लिनिक येथील डॉ. मनोज लडकत व डॉ. सौ. सारिका लडकत यांना क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या माध्यमातून मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
कोरोनाच्या विविध लाटेनंतर विविध साथीच्या आजार सर्व ठिकाणी चांगलेच बळावले होते त्यामध्ये भीमा चारीटेबल ट्रस्ट अंतर्गत मंगल क्लिनिक येथे लडकत दांपत्य हे सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी अत्यंत अल्प दरामध्ये आपले क्लिनिक चालवत आहेत. त्यांच्यासाठी फलटण येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.



