काडसिद्धेश्वर संस्थान च्या “इम्युनिटी बूस्टर” डोस चे कोविड पार्श्वभूमीवर गुरसाळे येथे मोफत वाटप


स्थैर्य, खटाव, दि.१४: सद्यस्थितीत कोरोना संसर्गजन्य आजार खेड्यापाड्यात पोहोचला असून,रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.राज्य शासनाच्या “माझं कुटुंब माझी जबाबदारी”मोहीम सुरू आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून,कणेरी मठ, कोल्हापूर येथील श्री काड सिद्धेश्वर महाराज संस्थान मार्फत अगदी शहरापासून खेड्यापर्यंत कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथी “इम्युनिटी”बूस्टर चा डोस मोफ़त देण्याच काम करीत आहे.

खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील काही ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते यांनी हा मोफत इम्युनिटी बूस्टर डोस वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.

शासनाच्या नियमांचे पालन करीत या ग्रामस्थांनी मास्क बंधनकारक,सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर आदी सूचना देत या बूस्टर डोस चे वाटप केले. बिसलरी बाटली मध्ये मिक्स करून प्रत्येक गावकऱ्यांला हा डोस देण्यात आला.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी शाखा प्रमुख विष्णु जाधव,माजी ग्रा पं सदस्य खुदबुद्दीन शिकलगार, बाजीराव आण्णा जाधव,विश्वास श्रीरंग जाधव,प्रसाद चिंचकर सर,आप्पासाहेब जाधव गुरुजी, विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअर मन प्रशांत वाघ, संभाजी जाधव,धोंडीराम जाधव,मकरंद जाधव,सचिन जाधव,तंटा मुक्ती अध्यक्ष साहेबराव पाटोळे, ऍड नंदकुमार वाघमोडे आदींच्या हस्ते हे बूस्टर डोस चे वाटप करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!