स्थैर्य, सातारा दि 12 : दुकानातून प्लंबिंगचे साहित्य घेवून खोटे चेक देवून 57 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, संदीप सतीश कदम यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चव्हाण कॉम्लेक्स येथे मोरया एन्टरप्रायजेस हे प्लंबिंगसाठी लागणारे साहित्याचे दुकान आहे. याठिकाणी एक अज्ञात संशयीताने येवून प्लंबिंगचे साहित्य घेतले. तसेच कदम यांचे मित्र महेश शहाजी कदम, अमोल तानाजी हवालदार, केशव राघव चोटलिया यांच्याकडूनही प्लंबिंगचे साहित्य घेतले. या साहित्यापोटी संशयीताने त्यांना दिलेले चेक खोटे निघाले. याप्रकरणी फसवणूक केल्याची फिर्याद कदम यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.