दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । सातारा । रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची पाच जणांनी ४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ ऑगस्ट २०२१ ते दि. २३ ऑगस्ट २०२१ दरम्यान संदिपान आनंदराव पवार, माधुरी संदिपान पवार, सचिन संदिपान पवार, नंदा संदिपान पवार सर्व रा. बेलवडे हवेली, ता. कराड यांनी रोहित बाजीराव पाटील रा. नांदगाव, ता. कराड याला रेल्वेमध्ये ज्युनियर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याची ४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली.