स्थैर्य, सातारा, दि. १२: जमिन गहाणमुक्त नसताना उतार्यावरील नावाची नोंद कमी करून व बेकायदेशीर दस्त बनवून विक्री केल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप बाबू बनसोडे वय 46, संजय बाबू बनसोडे वय 48, लक्ष्मी अनिल गाडे वय 40 सर्व रा. बौद्ध वस्ती, कोडोली, सातारा आणि नंदकुमार विठ्ठल सुतार वय 38, रा. कोडोली, अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत फिर्यादी अशोक संभाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटल आहे की, फिर्यादीचे पूर्व हक्कादार आजोबा महादू पिराजी गायकवाड यांनी कै. शिवराम शंकर बनसोडे व त्याचा चुलतभाऊ शंभू लक्ष्मण बनसोडे यांनी घेतलेले सोसायटीचे कर्ज भागवण्यासाठी कै. शिवराम शंकर बनसोडे यांनी स्वतःच्या जमिनी 5 वर्षांकरिता खरेदी दस्ताने गहाण ठेवलेल्या होत्या. त्यांचा नोंदणी दस्त 1949/दि. 26/6/1939 आहे. या जमिनी कै. शिवराम बनसोडे व त्यांच्या वारसांनी गहाणमुक्त केल्या नव्हत्या. हे माहित असूनही त्यांच्या वारसदारांनी फिर्यादी यांच्या आजोबांच्या नावाची नोंद बेकायदेशीर दस्त तयार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सपोनि मछले तपास करत आहेत.