अल्पवयीन मुलाकडून सोने घेऊन फसवणूक; सहा जणांवर गुन्हा


 

स्थैर्य, सातारा, दि.२: सातारा येथील गुरुवार पेठेतील एका अल्पवयीन मुलाचा विश्‍वास संपादन करून तुझ्या वडीलांवर आमचा विश्‍वास नाही, घरातील सगळे सोने तुझ्या आईच्या नावावर बॅंकेत ठेवतो” असे सांगून तीन लाख रुपये किंमतीचे सोने व एक दुचाकी घेउन गेले. मात्र, ते सोने बॅंकेत न ठेवता स्वत:कडे ठेवून विश्‍वासघात केल्याची तक्रार नाजमिन समीर शेख (रा.गुरूवार पेठ,सातारा) याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी नासिर लतीफ शेख, नौशाद नासिर शेख, तौसीफ नासिर शेख (तिघे रा. वाठार स्टेशन ता. कोरेगाव), अंजुम समीर होडगीकर (रा. रामवाडी, पेन), मुद्दसर बागवान (रा. राजवाडा, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार व संशयित हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यातील तक्रारदार हे अल्पवयीन असल्याने संशयितांनी त्याचा गैरफायदा घेत, त्याच्या वडिलांच्यावर विश्‍वास नसल्याचे सांगून घरातील सोने व एक दुचाकी दिव्यनगरी (ता.सातारा) येथून घेऊन गेले. यातील सोने हे तक्रारदार यांच्या आईच्या नावानो बॅंकेत ठेवतो असे सांगितले होते. मात्र, संशयितानी सोने बॅंकेत न ठेवता ते संगनमताने स्वत:कडे ठेवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!