दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२३ | सातारा |
कारंडवाडी (ता. सातारा) येथील सहा महिला शेतातील काम आटोपून ट्रॅटर ट्रॉलीमधून घरी परतत असताना ट्रॅटर ट्रॉली कॅनॉलमध्ये कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात ट्रॉलीमधील चार महिला बुडून मृत्युमुखी पडल्या आहेत, तर दोघींना वाचविण्यात यश आले आहे.
लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (वय ५५), अरुणा शंकर साळुंखे (वय ६०), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६०, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत.
या घटनेची अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सातार्याजवळ असलेल्या कारंडवाडीतील सहा महिला शेतातील काम आटोपून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून घरी परतत होत्या. दरम्यान, त्यांची ट्रॅटर ट्रॉली कॅनॉलजवळ आली असताना अपघात होऊन ही ट्रॉली कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेत ट्रॉलीमधील चार महिला ठार झाल्या, तर दोन महिलांचा वाचविण्यात यश आले आहे. लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (वय ५५), अरूणा शंकर साळुंखे (वय ६०), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६०, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी बुडून मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत.
या घटनेने कारंडवाडीत शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यत केली जात आहे.