चार तोळ्यांचे गंठन चोरीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, नागठाणे, दि.४: नातेवाईकांकडे लग्नाला आलेल्या महिलेचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण राहत्या घरातून चोरट्याने लांबवले.वळसे(ता.सातारा) येथे ९ जानेवारी रोजी ही घटना घडली.याची फिर्याद सौ.सुनंदा मनोहर नलवडे (वय.४३,जवाहरनगर,ता.करवीर,जि. कोल्हापूर) यांनी बुधवारी बोरगाव पोलिसांत दिली.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वळसे येथील संगीता संजय वडर यांच्या मुलीचे लग्न ९ जानेवारी रोजी होते.त्यासाठी त्यांची भावजय सौ.सुनंदा नलवडे या कुटुंबियांसह वळसे येथे ८ जानेवारी रोजी आल्या होत्या.रात्री झोपताना त्यांनी त्यांचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण,नेकलेस व पेंडंट भावजय संगीता वडर यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते.त्यांनी ते दागिने घरातील डब्यात ठेवले.

लग्नाच्या दिवशी सुनंदा नलवडे यांनी दागिने मागितले असता डब्यात केवळ नेकलेस असल्याचे आढळले.चोरट्याने गंठण व पेंडंट असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.या नंतर ते घरी निघून गेले.नातेवाईकांकडे पुन्हा विचारपूस केल्यानंतर बुधवारी सौ.सुनंदा नलवडे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!