स्थैर्य, सातारा, दि.१८: येथील बोगदा परिसरात झालेल्या बजरंग गावडे यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या चौघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता दि. 21 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत माहिती अशी, घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून बजरंग लक्ष्मण गावडे (वय 40, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आकाश नितीन बल्लाळ (वय 20), अमन इस्माईल सय्यद (वय 20), तुषार प्रल्हाद धोत्रे (वय 24), आकाश उदयसिंह शिंदे (वय 24, सर्व रा. समर्थ मंदिर, बोगदा परिसर सातारा) यांना घटनेनंतर अवघ्या दोन तासातच अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 21 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी दिली आहे.