
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१०: साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरामध्ये उभ्या असलेल्या चार शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्नीशमनदालाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या आगीमुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. या बसच्या बाजूला मोठी इमारत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे दुर्घटना टळली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस चौकशी करत आहेत. या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
