वहागाव जवळ भीषण अपघातात चार ठारभरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक, 1 गंभीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.८:  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागांव (ता. कराड) गावच्या हद्दीतून भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार पलिकडील लेनवरील ट्रकला धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये चारजण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे तर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. हा अपघात रविवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील वहागावच्या हद्दीत झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, महामार्गावर कोल्हापूर दिशेने पुणे दिशेला भरधाव वेगात स्विफ्ट कार निघाली होती. वहागावच्या हद्दीत आल्यानंतर कार चालकाचा कारवरील ताबा आणि ती भरधाव कार दुभाजकावरून विरुद्ध बाजूच्या लेनवर गेली. त्यावेळी त्या लेनवर धावत असलेल्या ट्रकला जाऊन कारची जोरदार धडक बसली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला असून मोठा आवाज झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने न थांबता घटनास्थळावरून पोबारा केला. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले तर दोघांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र त्यातील एक जण उपचारापूर्वीच मयत झाला. तर दुसरा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी, महामार्ग पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.


Back to top button
Don`t copy text!