४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
स्थैर्य, फलटण दि.१८ : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र किसनराव तथा आर. के. निंबाळकर यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पकालीन आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (गुरुवारी) निधन झाले. राजाळे, ता. फलटण येथे त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
विविध वृत्तपत्रांचे ग्रामीण भागातील वार्ताहर म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्नांची विशेषतः शेती, शेतकरी, सहकार क्षेत्रातील समस्या शासन/प्रशासनासमोर मांडून त्याची तड लागेपर्यंत वृत्तपत्रांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला. शेतीविषयक समस्या, त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी अर्पिता प्रकाशन या संस्थेची स्थापना करुन त्या माध्यमातून कॅलेंडर, डायरी, पुस्तके प्रकाशीत करुन त्याद्वारे तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
राजाळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी गावातील तरुणांना एकत्र करुन रसिक कला क्रीडा मंच या संस्थेची स्थापना केली, सलग १५ वर्षे त्यामाध्यमातून व्याख्यान मालेचे आयोजन करुन विविध क्षेत्रातील विचारवंतांना राजाळे येथे आणून पंचक्रोशीतील ग्रामस्थांना यांचे विचार ऐकण्याची एक नामी संधी उपलब्ध करुन दिली.
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून केवळ फलटण नव्हे संपूर्ण राज्यातील ग्रामीण पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले, त्यातून विविध प्रश्न शासन/प्रशासनासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त प्रभारी कार्यकारी संचालक एच. के. निंबाळकर हे आर. के. निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.