सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिन होणार १५ ऑक्टोबर रोजी साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । भारतीय इतिहासात दि. 15 ऑक्टोबर 1932 रोजी समाजामध्ये मानाचे स्थान नसणाऱ्या व कायमचे समाज सुधारणापासून वंचीत व मागास रहिलेल्या समाजासाठी बँकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना झाली. दि. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी या घटनेला 90 वर्षे पुर्ण होत आहेत. या नऊ दशकामध्ये अनेक स्थित्यंतरे होऊन आजचा सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग अस्तित्वात आला आहे. या दिवसाची आठवण म्हणून दि. 15 ऑक्टोंबर 2022 हा दिवस सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्‌त नितीन उबाळे यांनी दिली.

या दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयाच्या A-1 हॉलमध्ये सकाळी 11 वा. जिल्हास्तरावरील कार्यक्रम आयोजित केलेला आहे.  या कार्यक्रमास जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागातर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!