
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 04 जुलै 2025 । फलटण । माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण नगरपरिषेदेमध्ये विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. ०४ जुलै रोजी दुपारी ०१ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली आहे.
तरी फलटण शहरातील महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या आजी – माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले आहे.
अवघ्या काही महिन्यांवर आता नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे, त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला सुद्धा महत्व प्राप्त झाले आहे.
