
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२१ । फलटण । भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे आज फलटण दौऱ्यावर येत आहेत. फलटणमध्ये येऊन नक्की कोणती भूमिका जाहीर करणार या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
आज दि. ०६ ऑक्टोबर रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “राजभवन” या निवासस्थानी माजी खासदार किरीट सोमय्या हे येणार आहेत. आज दि. ०६ ऑक्टोबर रोजी सातारा, कोरेगाव व खटाव दौरा करून किरीट सोमय्या फलटणमध्ये दाखल होणार आहेत. फलटण मधून सातारा जिल्हा दौरा झाल्यानंतर ते पुढे बारामती दौर्यासाठी मार्गस्थ होणार आहेत.
