दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । फलटण । सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो – खो असोसिएशनची सन २०२२ ते २०२७ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो- खो असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नितीन भोसले हे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक असून त्यांनी विविध समित्यांची सभापतीपदे भूषविली आहेत. तसेच ते बास्केटबॉलचे नामांकित खेळाडू आहेत.
फलटण येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ड्रॉइंग हॉलमध्ये आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदरील निवड हि बिनविरोध करण्यात आली आहे.
नितीन भोसले यांच्या निवडीबद्दल राज्य खो – खो असोसिएशनचे मार्गदर्शक व विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, कृषी व सर्वच क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.