महादेव जानकरांना मोहिते – पाटलांचा आशीर्वाद?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 09 मार्च 2024 | फलटण | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर हे आगामी माढा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या समवेत कायमच असल्याचे बघायला मिळाले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचा महादेव जानकर यांना आशीर्वाद मिळाला आहे का? असे प्रश्न सध्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उपस्थित राहत आहेत.

आगामी काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आगामी निवडणुकीत विजयसिंह मोहिते – पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते – पाटील यांनी मोर्चेबांधणी केलेली आहे. पक्षाकडे तिकिटाची मागणी सुद्धा केली आहे.

सन 2019 आली माढा लोकसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचा गट हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करत होता. परंतु त्यानंतर पुलाखालुन बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे सन 2019 साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यामधून तब्बल एक लाखांचे लीड मिळाले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये जर महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी असेल तर मोहिते पाटील गट महायुतीच्या विरोधात काम करेल; असे मत अनेक जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मोहिते – पाटील यांनी महादेव जानकर यांना आशीर्वाद दिला आहे का? भारतीय जनता पार्टीने जर उमेदवारी देताना विचार केला नाही तर नक्कीच मोहिते पाटील गट आहे महादेव जानकर यांना मदत करेल असे मत व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!