माजी नगरसेवक भरत बेडके व अजिंक्य बेडके पुन्हा राजेगटात


दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा फलटणमधील उद्योजक भरत दत्ताजीराव बेडके व त्यांचे चिरंजीव अजिंक्य बेडके यांनी राजेगटप्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी पुन्हा विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची बुधवारी सकाळी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात पुन्हा प्रवेश करून स्वगृही आल्याचा आनंद व्यक्त केला.

यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष जयकुमार इंगळे, दादासाहेब चोरमले, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह ना. निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!