सरकारकडून धनगर आरक्षणासाठी अभ्यासगटाची निर्मिती

मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहारमधील कार्यवाहीचा अभ्यास करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ नोव्हेंबर २०२३ | मुंबई |
मराठा आरक्षणाच्या धर्तीवर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरित सचिव सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ९ जणांचा अभ्यासगट नेमला आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा आणि बिहार राज्यांतील आरक्षणाच्या सवलतीचा अभ्यास करण्याचे काम ही समिती करणार आहे. तसेच पुढील तीन महिन्यांत संबंधित समितीने केलेल्या अभ्यासाचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा, यासंदर्भातील शासन आदेश सोमवारी जारी करण्यात आला.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी राज्यातील विविध भागात धनगर समाजाकडून आंदोलने, मोर्चे आणि उपोषण करण्यात येत आहे. हा आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत डोईजड होऊ नये यासाठी सरकारने पावले उचलायला सुरूवात केली आहे. त्यानुसार धनगर समाजाचा मध्य प्रदेश, तेलंगणा आणि बिहार राज्यांनी त्यांच्या अधिकारात जातीनिहाय यादीत समावेश केल्याचा अभ्यास करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

यानुसार मुंबई महापालिकेचे अतिरित आयुत सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार उच्चपदस्थ अधिकार्‍यांसह चार अशासकीय सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीने इतर राज्यातील आरक्षणाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून तो अहवाल येत्या तीन महिन्यात शासनाला सादर करावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

अशी असेल समिती :

  • सुधाकर शिंदे – अध्यक्ष
  • दे. आ. गावडे – सदस्य सचिव तथा विभागाचे प्रतिनिधी
  • संतोष वि. गावडे – सदस्य
  • धनंजय सावळकर – सदस्य
  • जगन्नाथ महादेव विरकर – सदस्य
  • जे. पी. बघेल – अशासकीय सदस्य
  • अ‍ॅड. एम. ए. पाचपोळ – अशासकीय सदस्य
  • माणिकराव दांडगे पाटील – अशासकीय सदस्य
  • इंजि. जी. बी. नरवटे – अशासकीय सदस्य

Back to top button
Don`t copy text!