फलटण येथे ७ जानेवारीला माळी समाज वधू-वर परिचय मेळावा


दैनिक स्थैर्य | दि. २१ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र माळी समाज महासंघ, पाक्षिक महामित्र परिवार यांच्या वतीने फलटण येथे रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ रोजी माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे ३२ वे वर्ष आहे.

हा परिचय मेळावा ०७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे संपन्न होईल. या संधीचा फायदा समाजातील उपवर वधू-वर व पालकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे महाराष्ट्र माळी समाज महासंघाने म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी दशरथ सदाशिव फुले (संपादक ‘महामित्र’, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, फुले बिल्डिंग, फलटण, जिल्हा सातारा) यांच्याशी मो. नं. ९८२३२७२५२३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!