
स्थैर्य, फलटण, दि. ३१ : जगभरात करोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्या नंतर देशभर शासनाने लॉकडाऊन जाहिर केला त्या मुळे छोटे मोठे उद्योग व्यावसाय बंद पडल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या मुळे शासनाने लॉकडाऊन काळातील छोट्या व्यवसायिकांची संपुर्ण विजबिल माफ करावे, गेल्या दिड दोन महिन्यापुर्वी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यावेळी पासुन सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या व हातावर पोट असलेल्या लोकांचे आता खूप हलाखीचे दिवस सुरु झाले आहेत. शहरातील छोटे व्यावसायिक म्हणजेच टपरीधारक, कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांनातर आपला शेतमाल मातीमोल किंमतीत विकावा लागत आहे. काही शेतकऱ्यांना तर आपला शेतमाल शेतातच सोडून द्यावा लागला आहे. एकंदर सर्वच नागरिक अडचणीत सापडले असून उद्योग धंदे, व्यवसाय बंद पडल्याने त्यांना वीज बिल भरणे शक्य होणार नाही. तरी शासनाने वीज बील माफ करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केलेली आहे.