मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । मुंबई । मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू यांनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मॉरीशस आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासूनचे मैत्री संबंध आहेत. हे संबंध अधिक दृढ होण्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण होणेही गरजेचे आहे.

मॉरीशसमधील मराठी बांधवांसाठी आणि मराठी संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी नक्कीच भरीव सहकार्य करण्यात येईल. विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठीही भरीव प्रयत्न करण्यात येतील. सहकार्याची नवीन क्षेत्रं शोधण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू म्हणाले, भारत आणि मॉरीशसचे मैत्री संबंध जुने आहेत. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य आहे. ते अजून वृद्धींगत करण्यास मॉरीशस उत्सुक आहे. मॉरीशसमध्ये भारतीय आणि विशेषतः मराठी बांधव मोठ्या प्रमाणावर आहेत. विविध उपक्रमांद्वारे ते मराठी संस्कृतीचे जतन करत आहेत. विविध क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्‍ज्ञांचीही मॉरीशसला गरज असल्याचेही मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री गानू यांनी सांगितले.

मॉरीशस येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना यावेळी निमंत्रित करण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!