कऱ्हाडातील ‘वाहतूक’चा कारभार प्रथमच महिला पोलिस अधिकाऱ्याच्या हाती!

स्थैर्य, कराड, दि.११: शहर पोलिस
ठाण्याच्या वाहतूक आणि डीबी शाखेला एकच प्रभारी अधिकारी नेमण्यात आले होते.
त्याबाबत “सकाळ’ने “मर्जीतील अधिकाऱ्यांची दोन शाखांवर वर्दी’ असे वृत्त
प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक अजकुमार बन्सल यांनी शहर
वाहतूक शाखेला सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांची नियुक्ती केली.
त्यामुळे वाहतूक शाखेला अखेर अधिकारी मिळाला आहे. 

शहर पोलिस ठाण्याची वाहतूक शाखा स्वतंत्र आहे. ती पोलिस अधीक्षकांच्या
अधिपत्याखाली सुरू आहे. एक अधिकारी, 43 कर्मचारी तेथे कार्यरत आहेत. त्या
पदावरील फौजदार विकास बडवे यांची कोल्हापूर येथे बदली झाली. त्यानंतर ते पद
रिकामे होते. त्या काळात सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांची नियुक्ती
झाली. त्यांच्याकडे डीबीचाही अधिभार होता. त्यामुळे त्यांची कसरत होत होती.
त्याबाबत “सकाळ’ने वस्तुस्थिती मांडली. 

पदवीधर, शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता होती. त्यामुळे
पोलिस अधीक्षक बन्सल यांनी त्या नेमणुका थांबविल्या होत्या. त्याची
आचारसंहिता संपताच काही नियुक्‍त्या केल्या. त्यामध्ये कऱ्हाड वाहतूक
शाखेचीही नियुक्ती केली. त्यात सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांची नियुक्ती
झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार घेतला आहे. शहरातील वाहतूक शाखेचा डोलारा
मोठा आहे. तो सांभाळण्यासाठी प्रथमच एका महिला पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक
झाली आहे. त्या वाहतूक शाखेचे आव्हान कसे पेलतात, ते पाहावे लागणार आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!