दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा निमित्त फलटण शहरामधील प्रमुख असणाऱ्या गाजानन चौकामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्या वारकऱ्यांच्या नेत्र तपासणी नंतर चष्मा चे नंबर लागलेली आहेत, अशांना चष्मे सुद्धा मोफत देण्यात आलेले आहेत.
नेत्र तपासणी शिबिर साठी डॉ. रवींद्र बाबर व डॉ. सौ. सता मोरे यांचे विशेष सहकार्य यावेळी लाभले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ चोरमले व राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई संदीप चोरमले यांनी केलेले होते.
सदर कार्यक्रमासाठी प्रयाग सामाजिक संस्थेच्या सौ प्रीती भोजने यांचे विशेष सहकार्य लाभले. यासोबतच मंडळाचे मार्गदर्शक, कार्यकर्ते यांच्यासह चोरमले व मित्र परिवाराचे सुद्धा मोलाचे सहकार्य सदर कार्यक्रमासाठी लाभले.